खूप काही

ISRO करणार मानवरहित अंतराळ मिशन सोबत आणखी 14 मिशन्सचा श्री गणेशा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो 2021 मध्ये खूप नवनवीन उपक्रम हाताळणार आहे. यातीलच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे मानवरहित अंतराळ मिशन आणि या महत्वपूर्ण मिशन सोबतच इसरोने आणखी 14 मिशन्सची जवाबदारी उचलली आहे. रविवारी झालेल्या ब्राझील च्या अमेझोनिया -1 सोबत 19 सॅटेलाइट च्या सफळ लाँच नंतर इसरो चे चेअरमैन के. सिवन यांनी वैज्ञानिकांशी बोलताना या गोष्टीचा उल्लेख केला. 

सिवन यांनी हे वर्ष खूप व्यस्त असणार असल्याचे सांगितले. सोबतच, या वर्षी आपण 14 मिशन लाँच करणार असून यातील सात लाँच व्हीकल मिशन आणि सहा सॅटेलाईट मिशन असणार आहेत. तसेच वर्षाअखेर पर्यंत आपण आपला पहिला मानवरहित मिशन सुद्धा पार पडणार आहोत. हे आमच लक्ष आहे आणि वैज्ञानिक यावर काम करत आहेत. 

इसरो गगनयान मिशन च्या आधी दोन मानवरहित अंतरिक्ष मिशन पाठवण्याची योजना बनवत आहे. गगनयान मिशन अंतर्गत तीन भारतीयांना 2022 पर्यंत अंतराळात पाठवण्यात येणार आहे. यासाठी चार टेस्ट पायलट निवडले गेले असून सध्या रुसमध्ये त्यांचे प्रशिक्षण चालू आहे. 

यावर्षी इसरो आपली सर्व लक्ष गाठेल असा विश्वासही सिवन यांच्या बोलण्यातून झळकत होता. सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सर्व केंद्रांवर न्यू नॉर्मल चे सुद्धा पालन केले जाईल अशी ग्वाही सिवण यांनी दिली. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments