खूप काही

जसप्रीत बुमराह अडकतोय विवाहबंधनात जाणून घ्या बुमराहची नवराई कोण?

3 मार्च पासून भारत आणि इंग्लंड मधील चौथ्या टेस्ट मॅच ला सुरवात झाली आहे. या मॅचच्या सुरवाती आधीच भारतीय संघाचा दिगज्ज खेळाडू जसप्रीत बुमराह ने खासगी कामा निम्मित आपल नाव मागे घेतलं होत परंतु  कोणालाच बुमराह ने घेतलेल्या या निर्णया मागच खर कारण माहित नव्हतं. पण आता याच खरं कारण सर्वांसमोर आल आहे. BCCI ने त्यांच्या ट्विट मार्फत याच आठवड्यात जसप्रीत विवाहबंधनात अडकणार असल्याचा खुलासा केला आहे. अर्थातच आपल्या लग्नकार्याच्या तयारी साठीच जसप्रीत ने आपले नाव या महत्वपूर्ण सामन्यातून मागे घेतले आहे. (Jaspreet Bumrah going to marry soon.)

BCCI ने सांगितलं की बुमराह लवकरच लग्न करणार आहे. आयुष्यातील या नवीन टप्प्याच्या तयारीसाठी त्याला काही वेळ हवा होता.  याच कारणामुळे चौथ्या टेस्ट मॅच मधून आपलं नाव रद्द करण्याची विनंती बुमराहने केली होती. 

बुमराह च्या लग्नाच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. चौथ्या टेस्ट मॅच मधील बुमराहच्या गैरहजेरी मुळे चाहते नाराज झाले होते परंतु बुमराहच्या अनुपस्थीतीच खर कारण कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. 

बुमराहच लग्न सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनत चाललाय पण बुमराहच लग्न कधी , कुठे आणि कोणाशी होणार हे अजूनही गुपितच आहे. परंतु बुमराहची नवराई कोण होणार असा प्रश्न करता एक यादी समोर धरता येते या यादी नुसार जर कोणाचं नाव पहिले घेतलं जात असेल तर ती आहे, तेलगु अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन. या आधीही अनुपमा आणि बुमराहच्या अफैर संबधी किस्से समोर आले आहेत. बुमराह किंवा अनुपमा या दोघांपैकी कोणीही या बाबतीत काहीच खात्रीदाय खुलासा केला नाही आहे. पण 2019 पासूनच बुमराह सोबत अनुपमाच नाव जोडल जात असल्याची चर्चा होत आहे. 

बुमराहची नवराई कोण?  या यादीत दुसरं नाव येत,ते क्रिकेट प्रेसेंटर संजना गणेशन. संजनाने काही टूर्नामेंट कव्हर केले आहेत. सोबतच केकेआर फॅन शो सुद्धा होस्ट केला होता. बुमराह चे नाव संजाना सोबत सुद्धा जोडले गेले आहे. 

याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते तेलगु अभिनेत्री राशि खन्ना . राशि ने अनेक तेलगु चित्रपट केले सोबतच मद्रास कॅफे या बॉलीवूडच्या चित्रपटात ही ती दिसली होती. बुमराहची नवराई कोण?  या यादीत राशि चे नाव येत असले तरीही बुमराह आणि राशि च नाव एकत्र घेतलं जाण्याच्या प्रकरणावर ही फक्त अफवा असल्याचं राशिने स्पष्ट केले होते. 

बुमराहची नवराई कोण ? या प्रश्नच उत्तर सध्या अनुत्तरित असलं तरीही लवकरच या रहस्यावरून पडदा उठणार आहे. उत्सुकता याच गोष्टीची आहे की नवराई या यादीतलीच कोण होतेय की अजून कोणी? 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments