फेमस

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह लवकरच लग्नबंधनात अडकणार…

टीम इंडियाचा फास्ट गोलंदाज व यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बुमराहने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून आणि त्यानंतरच्या टी-20 सिरीज मधून माघार घेतली आहे . पण सु्ट्टी घेण्यामागचे नक्की कारण काय होते ते आत्ता समजले आहे. बुमराह लवकरच लग्नबेडित अडकणार आहे.

बुमराहची नक्की होणारी बायको कोण ? याबाबत सुरुवातीला दोन नावांची अनेक सोशल मीडिया वरती चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर सजंना गणेशन हिच्याशी लग्न करणार असल्याचे समजले आहे.सुरुवातिच्या काही दिवसांमध्ये बुमराहचं नाव अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं.

बुमराह आता या वीकेंडला म्हणजेच 13 किंवा 14 मार्चला गोव्यात संजना हिच्यासोबत लग्न करणार आहे. संजना ही खूप प्रसिद्ध क्रिकेट प्रेंझेंटेटर आहे. संजनाने आतापर्यंत क्रिकेटशी संबंधित अनेक कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पार पाडले आहेत. तसेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी तिने फॅन शो होस्ट केला होता. संजनाने अनेकदा क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांमध्ये बुमराहची मुलाखत घेतली आहे. त्यामुळे ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखतात.

संजना आणि बुमराह विवाहबंधनात 14-15 तारखेला अडकणार आहेत.यापूर्वी दोघेही अनेकदा क्रिकेटशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. परंतु त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी कधीच कोणाती माहिती माध्यमांसमोर आलेली नाही . बुमराह आणि संजना दोघेही आपलं नातं सर्वांपासून लपवून ठेवण्यात यशस्वी झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

लग्नात टीम इंडियातील खेळाडूंची अनुपस्थिती :इंग्लंडचा संघ आत्ता भारत दौऱ्यावर असल्याचे दिसून येते.त्यामध्येच भारताने इंग्लंडविरुद्धची झालेली कसोटी मालिका नुकतीच जिंकली आहे. संघांमध्ये आता टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवली जाणार आहेत . कोव्हिड-19 मुळे बनवलेल्या नियमांमुळे दोन्ही संघ सध्या बायो बबलमध्ये आहेत. त्यातून बाहेर पडून कोणताही खेळाडू बुमराहच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments