खूप काही

JEE 2021मधील भारताचा टॉपर मृदुलं अग्रवाल.

राजस्थानमधील मृदुल अग्रवाल आणि दिल्लीची काव्या चोपडा यांनी 300 पैकी 300 मार्क्स मिळवले आहेत.

जेईई मार्च 17 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात एकूण 13 विद्यार्थ्यांना शंभर गुण मिळवण्यात यश मिळाले आहे. त्यातले दोन विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. जेईई-मेन मार्च 2021 परीक्षेचा निकाल (NTI) ने आपल्या वेबसाईट आणि जेईई-मेनच्या वेबसाईटद्वारे निकाल जाहीर केला आहे. या पेपर मध्ये 6 लाख19 हजार 638 विद्यार्थी सहभागी झाले होते.

राजस्थान मधील मृदुल अग्रवाल आणि दिल्लीची काव्या चोपडा यांनी 300 पैकी 300 मार्क्स मिळवले आहेत. मृदुल यांनी यावर्षी दुसर्‍यांदा परीक्षा दिली आहे. त्याला 295 मार्क्स मिळाले होते. परंतु दुसऱ्यावेळी त्यांनी 300 मार्क्स मिळवून संपूर्ण भारतामध्ये टॉप केला आहे.

मृदुल याने सांगितले की, हा माझा दुसरा प्रयत्न होता. मी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये परीक्षा दिली होती. त्यात मला 295 गुण मिळाले होते. पहिल्या परीक्षेसाठी मी पूर्ण डेडिकेशनने तयारी केली होती. मला वाटलं नव्हतं की मला 300 पैकी 300 गुण मिळतील. मी एकदम निर्धास्त होऊन परीक्षा दिली होती. पहिल्या परीक्षेच्या गुणामुळे माझे आई-बाबा आधीच खुश होते. परंतु जेव्हा 300 पैकी 300 मिळाले तेव्हा ते अजूनच खुश झाले. माझे पालक कायमच मला सपोर्ट करतात.

यानंतर मृदुल JEE advance ची तयारी करणार असून त्याला आयआयटी बॉम्बे मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याला कम्प्युटर सायन्सचा अभ्यास करायचा आहे. मृदुलंने अकरावीला असतानाच परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली होती. लॉकडाऊन त्याला चांगलाच फायदा झाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments