खूप काही

JEE Main Result 2021: थोड्याच वेळात जेईई चा निकाल जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती…

राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडून (एनटीए) घेण्यात येणाऱ्या जेईई च्या मुख्य परीक्षेचा निकाल (जेईई मेन निकाल २०२१) लवकरच जाहीर केला जाणार आहे.अशी बातमी शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी ट्वीटद्वारे सर्वांना सांगितली आहे.

23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या जेईई मेन फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 6,61,776 विद्यार्थ्यांच्या नोंदण्या होत्या .एनटीएने जाहीर केलेल्या आकेवारीनुसार, पेपर १ (बी.टेक, बीई) मध्ये 95 टक्के तर पेपर (बीआरच, बीपीएलनिंग) मध्ये 81.2 उमेदवार उपस्थित होते.

जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्र निकाल अधिकृत संकेतस्थळावर आज 08 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

निकाल तपासण्यासाठी लिंक एनटीए मध्ये आपल्याला jeemain.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली दिसून येईल. एजन्सीने सर्व शिफ्टमध्ये मंगळवार 07 मार्च रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचे उत्तर आधीच जाहीर केले होते.

एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा देऊ शकते:

यावर्षी जेईई मुख्य परीक्षा वर्षातून 4 वेळा घेण्यात येणार आहे. विद्यार्थी एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा देऊ शकतात. प्रत्येक सत्रात प्राप्त केलेल्या संख्येपैकी सर्वात चांगला स्कोअर योग्य धरला जाईल.यावर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे हे असे करण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments