फेमस

‘मुंबई सागा’ च्या प्रोमोशन साठी जॉन चा वेगळाच अंदाज; इम्रान ने शेयर केला विडिओ

अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असणारा मुंबई सागा हा चित्रपट कालच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी जॉन ने वेगळीच युक्ती लढवली आणि थेट दिसला तिकीट विक्री काउंटरवर.

अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका असणारा मुंबई सागा हा चित्रपट कालच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी जॉन ने वेगळीच युक्ती लढवली आणि थेट दिसला तिकीट विक्री काउंटरवर. सोशल मीडिया वर जॉन अब्राहमचा एक विडिओ तुफान वायरल होत आहे, ज्यात स्वतः जॉन आपला चित्रपट मुंबई सागाचे तिकीट विकताना दिसत आहे. (Jonh abraham is selling tickets to promte his movie named ‘mumbai saga’.)

‘मुंबई सागा’ चित्रपटाला हिट करण्यासाठी जॉन अब्राहाम आणि इम्रान हाश्मी यांनी कुठलीच कसर सोडली नाही.
चित्रपट हिट करण्यासाठी स्वतः तिकीट विकणारा जॉन हा कदाचित पहिलाच अभिनेता असावा. कोरोना बंद नंतर चित्रपटगृह खुली झाली परंतु अजूनही हवी तशी प्रेक्षकांची वर्दळ चित्रपटगृहात पाहायला मिळत नाही आहे. म्हणूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यासाठी जॉनने ही युक्ती लढवली आहे.

जॉनचा चित्रपटगृहाबाहेर तिकीट विकतानाचा हा विडिओ इम्रान हाश्मी याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेयर करत
जॉनचे कौतुक केले आहे. इम्रानने ट्विटमध्ये लिहिले आहे की, अमर्त्य आणि विजय तुम्हाला यावर्षीचा सर्वात मोठा फेस ऑफ पाहण्यासाठी चित्रपटगृहात तुम्हाला आमंत्रित करत आहेत. सोबतच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा आणि चित्रपटाची मजा लुटा असं संदेशही इम्रानने आपल्या चाहत्यांना या ट्विटद्वारे दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments