खूप काही

कंगना घाबरली शिवसेनेसह ठाकरे सरकारला, सर्वोच्च न्यायालयाकडे अजब मागणी…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने (Bollywood actress Kangana Ranaut) सर्वोच्च न्यायालयाकडे एक अजब अपिल केले आहे, मुंबईच्या हायकोर्टमध्ये सुरु असलेल्या कंगनावरील केसचे शिमलाच्या कोर्टमध्ये ट्रान्स्फर करावी, असा अजब दावा कंगनाने केला आहे. (Kangana’s unique demand in the Supreme Court)

मला मुंबईला जाण्याची कोणतीच इच्छा नाही, कारण मुंबईतल्या शिवसेनेपासून आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारपासून माझ्या जीवाला धोका असल्याचे तीने सुप्रिम कोर्टात म्हटले आहे. मुंबईच्या हायकोर्टमध्ये सुरु असलेली केस शिमलाच्या कोर्टमध्ये चालवावी, अशी मागणी कंगनाने केली आहे. (Dispute between Kangana Ranaut and ShivSena)

24 फेब्रुवारी रोजी कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली नाही.

कंगना आणि तिची बहिण रंगोली यांच्याविरूद्ध धार्मिक तेढ निर्माण करणे आणि एका समाजाचा अपमान करणे, या मुद्द्यांवरून अंबोली आणि वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, त्याचीच सुनावणी सध्या सुरु आहे.

सध्या, कंगनाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (CISF) गृह सुरक्षा पुरवली जात आहे. मंत्रालयाने दिलेली वाय-प्लस श्रेणी सुरक्षादेखील तिच्यासोबत आहे.

सुप्रीम कोर्टाचे वकील नीरज शेखर यांनी कंगनाच्या बाजूने याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या जिवाला आणि तिथल्या संपत्तीला मुंबईमध्ये धोका आहे. एखाद्यावेळेस याचिकाकर्त्यांची सुनावणी मुंबईच्या बाहेर झाली नाही, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशाप्रकारची याचिका सुप्रिम कोर्टासमोर कंगनाने दाखल केली आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीने पाली हिल येथे असलेल्या कंगनाच्या बंगल्यावर कारवाई केली होती. त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनीदेखील कंगनाविरोधात केलेल्या अपमानास्पद विधानाचे उदाहरण देखील कंगनाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. (Kangana’s unique demand in the Supreme Court)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments