खूप काही

Ind vs Eng 2nd T20I : अहमदाबाद मध्ये रंगणार भारत विरुद्ध इंग्लंडचा दुसरा टी-20 सामना…

अहमदाबाद येथे आज भारत वि. इंग्लंड दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसर्‍या टी – 20 मध्ये भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसर्‍या टी – 20 मध्ये रोहित शर्मा पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येण्याची शक्यता आहे, तर सूर्यकुमार यादव यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

आज टीम मॅनेजमेंट भारतीय संघात बदल करते का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी – 20 मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप झाले होते, त्यामुळेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी करूनही मोठा स्कोअर करू शकली नाही. या मालिकेत भारतीय संघाला 5 सामने खेळायचे आहेत. इंग्लंडच्या संघाने पहिला टी -20 सामना जिंकून भारतीय संघावर नक्कीच दबाव आणला आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 15 टी -20 सामने खेळले गेले आहेत, त्यातील 7 सामने भारत आणि 8 सामने इंग्लंडचा संघ जिंकण्यात यशस्वी झाला आहे. दुसरा टी -20 सामना भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी खूप महत्वाचा आहे. अलीकडच्या काळात फिरकी गोलंदाजांसमोर कोहली अस्वस्थ दिसत आहे. अशा सामन्यात कोहली त्याच्या कमकुवतपणाचा निपटारा करून एक महान डाव खेळण्याचा प्रयत्न करेल.

भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये : जॉनी बेअस्टो, जेसन रॉय, डेव्हीड मलान, ओयन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, आदिल रशीद.

सामना वेळ : सामना हा भारताच्या वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार.

टीव्हीवर थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवरील चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.

ऑनलाइन प्रवाह : सामन्याचे ऑनलाइन प्रवाह हे हॉटस्टार आणि जिओ ॲपवर असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments