आपलं शहर

Uddhav Thackeray: “लॉकडाऊन हा पर्याय…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबार दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांसंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी एक मोठा संकेत दिला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कालच्या दिवशी महाराष्ट्रात विक्रमी 25,833 कोरोना रुग्ण आढळून आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नंदुरबार दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांसंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी एक मोठा संकेत दिला आहे.

“कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आपण आहोत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करणे हा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

“विदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे. तसेच त्याचे आकडेही आपल्या नियंत्रणात आले होते. परंतू आता जो नवीन विषाणू पसरत आहे याबद्दल आपल्याकडे माहिती अद्याप तरी दिलेली नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात नवे निर्बंध लागू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारकडून पुन्हा एकदा काही निर्बंध लावण्यात आले आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यातील सर्व नाट्यगृह, चित्रपटगृह, 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. तसेच याठिकाणी सरकारच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. (Lockdown an option going ahead, says CM Uddhav Thackeray)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments