खूप काही

Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरी दिक्षीतची OTT प्लॅटफॉर्मवर दमदार एन्ट्री..

लाखो दिलोंकी धडकन, बॉलीवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दिक्षीत (Madhuri Dixit) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवणार आहे. नेटफ्लिक्सच्या “फाईंडींग अनामिका (Finding Anamika)” या आगामी वेबसीरिजमध्ये माधुरी झळकणार आहे. या वेबसीरिजद्वारे ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने (Netflix India) 2021 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या वेबसीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. यामध्ये करण जोहरच्या Dharmatic या बॅनरखाली नेटफ्लिक्सवर पाच वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये माधुरी दिक्षितच्या वेबसीरिजचा समावेश आहे. या वेबसीसिरजमध्ये माधुरीसोबत मानव कौल, संजय कपूर, सुहासिनी मुळ्ये, मुस्कान जाफरी आदि कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, एका मोठ्या विश्रांतीनंतर माधुरी आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. तसेच तिच्या ओटीटी डेब्यूसाठी तिचे चाहतेही खूप उत्सूक आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments