खूप काही

API Sachin Vaze Arrested : हाय होल्टेज ड्रामानंतर सचिन वाझेंना अटक, 13 तास चाललेल्या केसचा शेवट कसा?

Maharashtra Assistant Police Inspector Sachin Vaze : एपीआय सचिन वाझे यांना अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यामागच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या कारणाने अटक केली आहे, शनिवारी दिवसभरात तब्बल 13 तास कसून चौकशी केल्यानंतर अखेर अटक करण्यात आली आहे. (Antilia-SUV Case: Cop Summoned By Probe Agency Arrested)

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यावर कलम 286, 465, 473, 506(b), 120(b), त्यासोबतच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएसच्या रडारवर होते. अखेर NIA प्रदीर्घ चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

आता संयम नाही, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली आहे, असं धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणाऱ्या सचिन वाझे यांनी शनिवारी मुंबई कोर्टामध्ये अटक पुर्व जामिन सादर केला होता, मात्र हाय कोर्टाने तो जामिन फेटाळल्यानंतर NIA कडून चौकशी करण्यात आली.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा उचलून धरल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते. (Maharashtra Assistant Police Inspector Sachin Vaze)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments