कारण

Maharashtra Budget 2021-2022 Live: परिवहन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा 2021-22 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. आज जागतिक महिला दिन असून अजित पवारांनी राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा देत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात केली. 2021-22 आर्थिक वर्षात परिवहन क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आलेली आहे.

अर्थसंकल्पात परिवहन विभागासाठी 2500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे, नाशिक, नगर 235 किलोमिटर रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याकरिता 16 हजार 139 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूर मेट्रो नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

राज्यातील बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 1400 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे. अहमदनगर, वर्धा, बीड आणि परळी येथील रेल्वे मार्गांचे काम वेगाने करण्यात येणार आहे. सोलापूरमधील बोरामणी या विमानतळाचे काम वेगाने करण्यात येणार आहे. तसेच एलोरा विमानतळाचा विस्तार आणि पुण्याजवळच एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments