आपलं शहर

Maharashtra Budget 2021 Education: शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी 2400 कोटी

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 (Maharashtra Budget 2021): उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेमध्ये हा budget सादर केला.

2021-22च्या अर्थसंकल्पामध्ये अनेक अनेक गोष्टींची योजना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र संकटाला घाबरला नाही आणि घाबरणार नाही असं अजित पवार म्हणाले. अर्थसंकल्पामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागालाही अनेक योजनांची तरतूद करण्यात आलेली आहे.शालेय आणि क्रीडा शिक्षणासाठी 24 हजार कोटी देण्यात आलेले आहेत. नेहरू सेंटरला 10 करोड रुपयांचा निधी.

अमरावती विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला 10 कोटी रुपयांचा निधी तरउच्च शिक्षण विभागास 1300 कोटी रुपये allot करण्यात आलेले आहेत.प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान पार्क उभारलं जाणार त्यासाठी 300 कोटींची तरतूद राज्यात कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यास मंजुरी दिलेली आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत.पुण्यातल्या क्रीडा विद्यापीठात 4 अभ्यासक्रम सुरू होणार आणि 200 विद्यार्थांना प्रवेश आहे.सातारच्या सैनिक शाळेला येत्या तीन वर्षात 300 कोटींचा निधी देण्यात येणार आहे, त्यापैकी 2021-22 मध्ये 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments