कारण

Maharashtra Budget 2021-2022 Live: ‘महा’अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा

राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा 2021-22 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे. आज जागतिक महिला दिन असून अजित पवारांनी राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा देत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात केली.

संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प झाले होते. या काळात महत्वाची भूमिका आरोग्य क्षेत्राने बजावली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज आपल्याला पडली आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी सुरूवातीला केले. आरोग्य सेवेकरिता 7 हजार कोटींची तरतुद यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यात जिल्हा रुग्णालये, मनो रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्र तसेच ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये अनेक आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. महानगरपालिका क्षेत्राकरिता येत्या 5 वर्षांत सरकारकडून 5 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामधील 2021-22 आर्थिक वर्षासाठी 800 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. सिंधूदूर्ग, रायगड, धाराशिव-उस्मानाबाद, सातारा, नाशिक, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments