आपलं शहर

Board exams 2021: कोरोनाने डोक पुन्हा वर काढल्यावर 10वी आणि 12वी बोर्ड परिक्षांबद्दल काय निर्णय घेतला जाणार आहे?

मुंबई: मार्च महिना आला तरी दहावी – बारावीच्या board परिक्षणसंबद्धी कोणताही निर्णय झालेला नाही अस दिसून येतय. दहावी – बारावी परीक्षेच संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे, पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.याबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे”.ऑगस्टला सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं.गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात.हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments