कारण

Sanjay Rathod Resignation: संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांची स्वाक्षरी; राठोड झाले पदमुक्त

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले होते. पूजाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा राठोड यांचाच आहे असा आरोप भाजपकडून सातत्याने केला गेला. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी भाजपने केली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता.

परंतू, 4 दिवस झाले तरी राजीनामा राज्यपालांकडे सूपूर्द करण्यात आला नाही असा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला होता. त्यानंतर अखेर 4 दिवसांनी म्हणजे आज दुपारी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला आणि राज्यपालांनी त्यावर तात्काळ स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे आता त्यांच्या खात्याचा सर्व कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments