कारण

Video : ‘नव’ निर्माणाच्या दिशेने टाकलेलं मनसेचं नवं पाऊल, नवी घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पंधरावा वर्धापन दिन साजरा होत आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा शिवाजी पार्कवरचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द केला गेला आहे. या चौदा वर्षांच्या कालावधीत मनसेला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला, लागतोय. आज त्याच मनसेच्या निर्माणामागची कहाणी या लेखातून मांडणार आहोत.

राज श्रीकांत ठाकरे यांचा जन्म राजकीय कुटुंबात झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे ‘बाळकडू’ मिळत होते. आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवलीतले अग्रणीचे नेते होते. तर काका बाळासाहेब हे देखील शिवसेना या पक्षाचे प्रमुख, संस्थापक. त्यामुळे अर्थातच राज लहानपणापासूनंच बाळासाहेबांच्या सोबत असायचे. बाळासाहेबांच्या कित्येक सभांना राज उपस्थित राहिले आहेत. राज ठाकरे जेव्हा भाषण करत असतात त्यावेळेस त्यांची बोलण्याची शैली हूबेहूब बाळासाहेबांसारखी असल्याचे जाणवते. तोच ठाकरी बाणा, तीच शैली त्यामूळे लाखोंची गर्दी जमा करण्याची ताकद या नेत्यामध्ये आहे.

शिवसेनेला रामराम
राज ठाकरे तरूण वयापासूनंच शिवसेनेसाठी काम पहायचे. शिवसेनेतील महत्वाची पदे राज यांनी भूषविली आहेत. मात्र जानेवारी 2006 मध्ये काही अंतर्गत कारणामुळे राज यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांनी आपल्या नविन पक्षाची अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली.

आंदोलने, निवडणूका आणि बरंच काही…
मनसेच्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक आंदोलने गाजली. मग ते रेल्वे परिक्षेचे आंदोलन असो, की परप्रांतिय फेरीवाले विरोधात चालवलेली मोहिम असो. प्रत्येक आंदोलनात प्रचंड जनसमुदाय राज यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या सुरूवातीच्या काळातंच प्रचंड यश संपादित केले.

2007: पुणे महानगरपालिकेत 8 उमेदवार निवडून आले
2008: नाशिक महानगरपालिकेत 12 उमेदवार निवडून आले
2008: मुंबई महानगरपालिकेत 7 तर ठाणे महानगरपालिकेत 3 उमेदवार निवडून आले
2009: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मनसेचे 13 उमेदवार निवडून आले आणि आमदार झाले

दरम्यान, मागील काही काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरात निराशा आली आहे. मनसेला निवडणूकीत फारसे यश मिळेनासे झाले आहे. मात्र कृष्णकूंजवर कायमंच आपली समस्या घेऊन आलेल्या सामान्य जनतेची गर्दी पहायला मिळते. परंतू निवडणूकीच्या वेळेस इतर पक्षांना मतदान होते, अशी खंत स्वत: राज ठाकरे यांनी मध्यंतरी व्यक्त केली होती.

आज मनसेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना संबोधीत केले. त्यामध्ये त्यांनी “तुमच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी घडवीन हे माझं तुम्हाला वचन आहे,” अशी ग्वाही महाराष्ट्र सैनिकांना दिली आहे. त्यामुळे मनसेच्या पुढील काळात काय बदल, रणनिती असेल हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सूक आहेतंच..

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments