भारतीय नौदलातील नवा शिरोमणी ‘करंज’ ही स्वदेशी पाणबुडी होणार, १० मार्चला मुंबईत दाखल

भारतीय नौदलात लवकरच एक नवीन शिरोमणी लागणार. मेक इन इंडियाच्या ‘करंज’ या पाणबुडीची एन्ट्री लवकरच भारतीय नौदलात होणार आहे. करंज ही पूर्णपणे भारतीय बनावटीची पाणबुडी असणार आहे.
१० मार्च २०२१ ला मेक इन इंडियाची करंज पाणबुडी मुंबई मध्ये दाखल होणार आहे. (Make In India’s First ever Submarine ‘Karanj”.)
करंज पाणबुडी भारतीय नौदलातील तिसरी स्टील्थ कलवरी क्लास पाणबुडी असणार आहे. २०१७ नंतर नौसेनेत फंकशनिंग सुरु करणारी ही ६ कलवरी-क्लास डिझेल इलेक्ट्रॉनिक पाणबुड्यांमधील तिसरी पाणबुडी असणार आहे.
भारतीय नौसेनेतील कमांडिंग ऑफिसर कॅप्टन गौरव मेहता करंज बद्दल आपलं मत मांडताना म्हणतात, ‘आम्ही गर्वाने म्हणतो की करंज भारतातील पहिली स्वदेशी सबमरीन आहे. ही ‘मेक इन इंडिया’ च वास्तविक प्रमाण आहे. करंज आमच्यासाठी लहान बाळा प्रमाणे आहे, ज्याला आम्ही युद्धातील एक अस्त्र म्हणून सज्ज होताना पाहिलं आहे.’
करंज ६० मीटर लांबी असणाऱ्या लहान पाणबुड्यां प्रमाणे दिसते. ज्यामुळे हिची तुलना परमाणू ऊर्जेने चालणाऱ्या पाणबुड्यांशी कारण योग्य राहणार नाही. परंतु पाणबुडीच्या या क्लास चे सुद्धा आपले वेगळे असे काही फायदे आहेत. कारण कलवरी क्लासच्या सर्व पाणबुड्या महत्वाच्या आहेत. त्या आकाराने छोट्या असल्याने युद्धाभ्यास कारण सोपं होत. एवढाच नाही तर या पाणबुड्या ताटाच्या अगदी जवळ सुद्धा जाऊ शकतात.
कलवरी क्लासच्या पाणबुड्या पब्लिक सेक्टर शिपबिल्डर MDL (Mazgaon Dock Ltd ) द्वारे बनवण्यात येत आहे.
करंज ची निर्मिती फ्रांसीसी कंपनीच्या देखरेखी शिवाय बनवण्यात आले आहे. जी एक परकीय कंपनी आहे. एवढाच नाही तर या पाणबुड्यांच्या चालकांना भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्यांनीच प्रशिक्षण दिले आहे.
गेल्या ५० वर्षांपासून भारत विदेशी बनावटीच्या पाणबुड्या वापरत होता परंतु आता करंज पाणबुडी पासून भारतीय नौदल स्वदेशी पाणबुडी वापरण्यास सज्ज होईल.
#IndianNavy‘s third stealth Kalvari class submarine #Karanj to be commissioned on 10 Mar 21 at #Mumbai.#AatmaNirbharBharat@DefenceMinIndia@SpokespersonMoD @makeinindia@DefProdnIndia pic.twitter.com/gTvjdMz5h3
— SpokespersonNavy (@indiannavy) March 9, 2021