खूप काही

अबब! भोपालमध्ये मॅन ऑफ द मॅचला पुरस्कार म्हणून मिळालं 5 लीटर पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्याविरोधात देशभरात अनेक प्रकारे निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एका अनोख्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात निषेध नोंदविण्यात आला आहे.

काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांनी भोपाळ येथील करोंदमध्ये एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना सनरायजर्स 11 आणि शगीर तारिक 11 यांच्यात पार पडला. यामध्ये सनरायजर्स 11 ने सामना अंतिम सामना जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सलाउद्दीन अब्बासी या खेळाडूने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला.

दरम्यान, सलाउद्दीन जेव्हा मंचावर पुरस्कार स्विकारण्यासाठी आला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. सलाउद्दीनला पुरस्कार म्हणून 5 लीटरचा पेट्रोलचा कॅन दिला गेला. या प्रकाराने मैदानात हास्यकल्लोळ झाला. या स्पर्धेचे आयोजक मनोज शुक्ला यांनी सांगितले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात निषेध करण्याचा याहून चांगला रस्ता नाही आहे.”

“मोदी ब्रँड अनमोल पेट्रोल”
विशेष गोष्ट म्हणजे या पेट्रोलच्या कॅनवर “मोदी ब्रँड अनमोल पेट्रोल”, 5 लीटरची किंमत 510 रूपये आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा एक फोटोदेखील लावण्यात आला आहे. दरम्यान, हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments