आपलं शहर

आधी तोंड दाबून बेहोश केलं, नंतर मनसुख हिरेनला खाडीत फेकलं, मोठा खूलासा

सध्या दिवसेंदिवस मनसुख हिरेन प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत, त्यात ATS च्या सुत्रांनी आणखी एक माहिती समोर केली आहे.

सध्या दिवसेंदिवस मनसुख हिरेन प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत, त्यात ATS च्या सुत्रांनी आणखी एक माहिती समोर केली आहे. या माहितीमुळे अनेक गोष्टींचा मोठा उलघडा होण्याची शक्यता आहे. (mansukh hiren murder case)

मनसुख हिरेन प्रकरणातील तिघांवर आरोप सिद्ध झालेत, तर अजून काहीजणांचा या घटनेमध्ये हात असल्याचं ATS कडून म्हटलं जात आहे. या तिघांमध्ये सचिन वाझे, विनायक शिंदेसह अनेक जणांचा हात असण्याची शक्यता एटीएसने वर्तवली आहे. (After pressing his mouth and fainting, Mansukh Hiren’s body threw into the creek)

ATS च्या सुत्रांनुसार मनसुख हिरेनच्या हत्येदरम्यान विनायक शिंदे घटनास्थळी हजर होता. त्याच्यासोबत आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे.

विनायक शिंदेने मनसुख हिरेनला तावडे म्हणून फोन केला होता आणि ठाण्याच्या घोडबंदर रोडवर बोलवलं होतं. ज्या गाडीतून मनसुख हिरेन आला होता, त्याच गाडीमध्ये तोंड दाबून मनसुख हिरेनला बेहोश करण्यात आलं, त्यानंतर तोंडामध्ये रुमाल कोंबून मनसुखच्या शरिराला ठाण्याच्या घोडबंदर खाडीमध्ये फेकण्यात आलं.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये आल्याप्रमाणे मनसुख हिरेनची पाण्यात श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे कारण आता स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ATS कडून नवनवे खुलासे होत असताना मात्र आता हा तपास NIA कडे जाणार आहे, त्यामुळे या केसमध्ये अजून कोणाची नावे समोर येतात, हे पाहणे गरजेचे असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments