फेमस

VIDEO : IPL 2021 मध्ये कोणीच घेतलं नाही, रागाच्या भरात ठोकल्या 7 चौकारांसह 4 षटकार…

IPL मध्ये खेळण्याची आणि त्यातून करिअरमध्ये नव्या संधी मिळवण्याची इच्छा अनेक खेळाडूंची असते, मात्र सगळ्यांनाच संधी मिळेल, असं सांगता येत नाही. एका खेळाडूच्या बाबतीतही असाच एक किस्सा घडला आहे. (New Zealand batsman Martin Guptill has been ruled out of the 14th season of the IPL)

न्युझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टील याला IPL च्या 14 व्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली नाही. याच मार्टिन गुप्टिलने आपला जलवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिला आहे.

सध्या झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5 व्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला आहे. ही मालिका 3-2 च्या फरकाने न्यूझीलंडने आपल्या नावावर नोंदवली आहे. मात्र या सगळ्या सामन्यात एका खेळाडूचं नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे मार्टिन गुप्टील.

मार्टिनने या सामन्यात 46 चेंडू्ंची कारकिर्द गाजवली आहे. 46 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकांसह 71 धावांची विजयी खेळी केली आहे. षटकार आणि चौकारच्या बळावर मार्टिनने चक्क 52 धावा केल्याने न्यूझीलंडला विजय मिळवणे सहज शक्य झालं आहे.

सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये 8 बाद 142 धावा ऑस्ट्रेलियाला करता आल्या, त्यांचा पाठलाग करताना 27 चेंडून राखून न्यूझीलंडने वीजय मिळवला आहे.

न्यूझीलंडची बाजू सांभाळण्यासाठी आलेल्या मार्टिनने IPL मध्ये त्याला न घेणाऱ्या फ्रंचायजीला चोख उत्तर दिलं आहे. याआधी मार्टिनने किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबादसह अनेक संघांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र यावेळेस त्याला IPL मध्ये नाकारण्याचं कारण त्याला अद्याप समजलेलं नाही.


मात्र यावेळी ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात मार्टिनने केलेली कामगिरी अविश्वसनिय आणि त्याला न घेणाऱ्या फ्रंचायजींना दिलेली चपराख म्हणावी लागेल. (What a knock, Marty guptill departs for 71 (46) to a magnificent sky stadium ovation Clapping hands sign #NZvAUS)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments