कारण

नाणारच्या वादात कृष्णकूंजचा सहभाग, राज ठाकरे निभावणार महत्वाची भूमिका?

रत्नागिरीत उभारणारा तेलशुध्दीकरणाचा नाणार प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आला आहे. नाणारची फाईल राज्य सरकारकडून बंद केल्याची भूमिका आहे. त्यावर अजूनदेखील वादविवाद सुरु आहेत. मात्र हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो म्हणजे राज ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. (MNS chief Raj Thackeray to meet Nanar project victims)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 7 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्पाबद्दल काही आवाहन केले आहेत. नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देऊ नका, असंदेखील आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे, त्यामुळे पुन्हा एका या चर्चांना उधाण आलं आहे. Raj Thackeray’s letter to the Chief Minister regarding Nanar project

याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील नाणार प्रकल्पग्रस्तांचे काही प्रमुख नागरिक राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत. जवळपास 100 नाणार प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील, आणि नेमकं नाणार कोकणात का नको, याबद्दल माहिती देणार असल्याची शक्यता आहे.

कोणा-कोणाला पत्र…
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाणार संदर्भात पत्र लिहलं आहे. राज्याचे अर्थचक्र व्यवस्थित चालण्यासाठी नाणार महाराष्ट्रात राहण्याची गरज आहे, असं मतदेखील राज ठाकरे यांनी पत्रात मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments