खूप काही

Love Story : कॉलेजचं प्रेम, कॅबिनेट मंत्री ते खासदार सगळीकडे फक्त यांच्याच प्रेमाची चर्चा…

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या आणि बदायूचे भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांचा घटस्फोट झालाय. त्यांचे पती कँसर सर्जन डॉ. नवल किशोर शाक्य यांच्यापासून घटस्फोट (Divorce) घेतला.

या दोघांमध्ये अनेक मतभेद निर्माण झाल्याने ते मागील 8 वर्षांपासून वेगळे राहत होते. अखेर 19 जानेवारी 2021 रोजी हिंदू विवाह कायदा 1955 च्या आधारे दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी मिळाली. खासदार संघमित्रा मौर्यने 21 डिसेंबर 2017रोजी लखनौ कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

विशेष म्हणजे संघमित्रा मौर्य यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण घेत असताना झालेल्या प्रेमानंतर विवाह केला होता. मात्र, या प्रेमविवाहात काही काळ टिकला आणि कॉलेजमधील या प्रेमी जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

संघमित्रा मौर्य आणि डॉ. नवल किशोर शाक्य हे 2003 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही लखनौमधील ईरा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चं शिक्षण घेत होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. संघमित्रा मौर्य आणि डॉ. नवल किशोर शाक्य यांचं लग्न 3 जानेवारी 2010 रोजी लखणव मध्ये झाले. या लग्नाला तत्कालीन मुख्यमंत्री मायावती देखील आल्या होत्या.

खासदार संघमित्रा मौर्य नक्की आहेत तरी कोण ?संघमित्रा मौर्य यांनी आपल्या 2011 मध्ये कासगंज जनपदच्या सिढपुरा येथून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2012 मध्ये संघमित्रा यांनी अलीगंज विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढली.नंतर 2014 मध्येही मैनपुरी येथून मुलायम सिंह यादव यांच्याविरोधात निवडणूक लढली.

दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांचे वडील स्वामी प्रसाद मौर्य हे देखील बसपामध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर बदायूं लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आणि जिंकल्या.

कोण आहेत डॉ. नवल किशोर शाक्य :

डॉ. नवल किशोर शाक्य एक खूप प्रसिद्ध असे कँसर सर्जन आहेत. गरजुंना मदत करण्यास त्यांचा खूप मोठा वाटा मनाला जातात. लॉकडाउनच्या काळातही त्यांनी खूप गरजूंना मदत केली. डॉ. नवल किशोर शाक्य हे बौद्ध धर्म मानतात. लखनौ आणि कायमगंज हे त्यांचे लक्ष्य कँसर नावाने दोन रुग्णालयं आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments