कारण

Video : मुख्यमंत्र्यांचं वचन, MPSC स्पर्धा परीक्षांचा प्लॅन B ठरला, या दिवशी होणार एमपीएससी परीक्षा…

अचानक MPSC स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक शहरामधील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रमकतेची भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने गंभीर भूमिका घेतली. (MPSC competitive exams has been decided, MPSC exam will be held on this day)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची तातडीने भेट घेऊन या सगळ्यावर चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्च रोजी होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा 2020 ही पुढे ढकलल्याने अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. पुण्यासह अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होते.

या सगळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा दिला आहे. 14 फेब्रुवारी रोजी होणारी पुर्व परीक्षा जरी पुढे ढकलली असली, तरी येत्या आठ दिवसामध्ये ती परीक्षा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पुढील परीक्षा कधी होईल, याची तारीख 12 मार्च रोजी घोषीत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेच्या अटीचा प्रश्न उठवला जात होता, त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. वयोमर्यादेचा कोणालाही अडथळा येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या आठ दिवसात कोणत्याही परिस्थिती एमपीएससी स्पर्धा परीक्षा होणार, या प्रकारचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो विद्यार्थ्यांना दिलं आहे. (MPSC competitive exams has been decided, MPSC exam will be held on this day)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments