खूप काही

MPSC Exam : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यार्थी आक्रमक; मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

महाराष्ट्रात गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार योग्य ते नियोजन करत आहे. मात्र या सगळ्यात एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक झटका बसणारी बातमी आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. (MPSC exams postponed, students aggressive; Emergency meeting of the Chief Minister)

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारतर्फे निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नाही म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. याआधी एप्रिल आणि सप्टेंबर 2020 मध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती, मात्र कोरोनामुळे तीदेखील पुढे ढकलण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुणे, औरंगाबाद, सांगली, अमरावती, नांदेड, नाशिक अशा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष आता राज्य सरकारच्या पुढील निर्णयावर आहे. (MPSC exams postponed, students aggressive; Emergency meeting of the Chief Minister)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments