आपलं शहर

अखेर मुंबईकरांची चिंता संपली,मुंबईमधील 29 खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनाची लस, मुंबईकर पाहा ही यादी …

मुंबई : देशबरोबरच राज्यातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला आहे . या लसीकरणासाठी राज्य सरकारला देखील तितकेच काम करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्णय घेऊन सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी दिली आहे.

नुकतंच केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देश(माहिती) दिली आहे.त्यामुळे मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात भेटणार कोरोनाची लस. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार,सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेने याबाबतची यादी तयार केली आहे. व या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहेत.

मुंबईत ‘या’ रुग्णालयात मिळणार कोरोना लस :

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय

कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय

सुरुणा शेठिया रुग्णालय

हॉली स्पिरीट रुग्णालय

टाटा रुग्णालय

शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी

के. जे. सोमय्या रुग्णालय

डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय

वॉकहार्ट रुग्णालय

सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय

सैफी रुग्णालय

ग्लोबल रुग्णालय

सर्वोदय रुग्णालय

जसलोक रुग्णालय

करुणा रुग्णालय

एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय

SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय

पी. डी. हिंदुजा रुग्णालय

डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय

कौशल्य मेडिकल फाऊंडेशन

मसीना रुग्णालय

हॉली फॅमिली रुग्णालय

एस. एल. रहेजा रुग्णालय

लिलावती रुग्णालय

गुरु नानक रुग्णालय

बॉम्बे रुग्णालय

ब्रीच कँडी रुग्णालय

फोर्टिस, मुलुंड

द भाटिया जनरल रुग्णालय

खासगी रुग्णालयात 250 रुपये प्रतिडोस :

दरम्यान कोरोनाला थांबवण्यासाठी लसीकरणाचा हा दुसरा टप्पा राबवला जात आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तसेच 45 ते 60 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या माहितीनुसार निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य केले जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी 250 रुपये ऐवढा शुल्क आकारला जाणार आहे.

महापालिकेची कोविड लसीकरण केंद्र:

१)सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी

२)दहीसर जंबो रुग्णालय, दहीसर

३) बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे

४) मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड

५) नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव

60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल, तर ज्या नागरिकांना गंभीर आजार आहे अशांना डॉक्टरांनी दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

‘हे’ कागदपत्रे लागतील:

कोरोना लसीसाठी आधारकार्ड नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड,वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, MP/MLA/MLA चं आयडी कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, यापैकी कोणतीही माहिती तुम्ही दाखवू शकता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments