आपलं शहर

Mumbai Covid-19 update: विदर्भातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची स्टेशनवर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे

Mumbai: देशभरात कोरोणाचा कहर (spreading of coronavirus) पुन्हा एकदा वाढू लागला आहे.त्यात महाराष्ट्रतील पुणे आणि नागपुरात सर्वात जास्त रूग्न संख्या आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. विदर्भातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

मुंबईतील परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, कुर्ला या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. विदर्भातून येणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करण्यात येईल. त्यानुसार अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईत (Covid-19)तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा कहर इतर राज्यातही वाढू लागल्यामुळे दिल्ली, राजस्थान, गुजरात, केरळ, गोवा, विदर्भ येथून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईतील ठरावीत स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे. सरकार काढून वारंवार मास्क लावण्याचे हात धुण्याचे आणि सोशल डीसटनसिंग पाळण्याचे आव्हान केले जात आहे.

नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3679 नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.वर्ध्यातील एक महिला नागपूरच्या मनीष नगर भागात आली होती. त्यांची टेस्ट केली असता त्यांच्यात युरोपातील नव्या स्ट्रेनची लक्षणं दिसल्याचं प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मात्र नागपूरच्या नवीन स्ट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली असून यासंदर्भात तपास सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments