आपलं शहर

Mumbai local latest update: वाढत्या कोरोना रूग्णांमुळे बंद होणार लोकल? जाणून घ्या..

Mumbai Local: देशात कोरोनाचा उद्रेक परत एकदा वाढत आहे.दर दिवशी कोरोणाचे रुग्ण वाढतच आहेत.महाराष्ट्रात कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण आहे.महाराष्ट्रदर दिवशी रुग्णांचा नवीन रेकॉर्ड बनवत आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दररोज 5000 पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू केला आहे.पूर्ण महाराष्ट्रात रविवार पासुन नाईट कर्फ्यु लागू केला आहे आणि वाढत्या रूग्णांमुळे लॉकडाऊनसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.पण या सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुंबई लोकल चालू राहणार की बंद होणार? की फक्त सरकारी कर्मचऱ्यांसाठी चालू राहणार? याचा अर्थ सामान्य जनतेसाठी परत एकदा लोकल सेवा बंद होणार?

रेल्वेबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आहे.महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की मुंबई लोकलमधील प्रवासादरम्यान कोरोना मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले नाही तर प्रवाशांना आणखी निर्बंध लादले जातील.

ही माहिती देताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रवाश्यांनी फेस मास्क आणि कोरोना या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर राखले पाहिजे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments