आपलं शहर

Mumbai local train: वाढत्या कोरोना रूग्नांमुळे सेंट्रल रेल्वेचा मोठा निर्णय, बघा काय आहे latest update

Mumbai local train latest update : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईसोबत अनेक भागात कोरोना रुग्णांचे (corona Patient) रेकॉर्ड बनत आहेत. वाढत्या कोरोना रूग्नांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात लॉकडाऊन (lockdown) आणि रात्रीची संचारबंदी (night curfew) घोषित केली आहे.BMC ने मुंबई लोकलवर ही कडक नियम लागू केले आहेत.  (Big decision of Central Railway due to increasing corona patients)

रेल्वेने प्रवास करण्यासाठी मास्क अनिवार्य आहे. मध्य रेल्वेने गर्दी टाळण्यासाठी नागपूर आणि भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवल्या आहेत. सुमारे एक महिन्यापूर्वी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) मुंबईतील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपये केली.

मध्य रेलवेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांचं म्हणणं आहे की “हा निर्णय गेल्या काही वर्षांपासून घ्यायचा होता, आणि याचा वापर कधी कधी गर्दी नियंत्रणात आण्यासाठी केला जातो. जास्त करून सणवारांना, मेळावा किंवा इतर काही दिवशी केला जातो. कोरोनामुळे उद्भवणार्‍या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिट दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हा निर्णय जनहितासाठी घेण्यात आला आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांच्या म्हणण्यानुसार ते लोकांना ट्रेनने प्रवास करण्यापासून पूर्णतः नाही थांबवू शकत पण वेळेत फेरबदल करणार. महिन्याच्या सुरवातीला अश्या बातम्या येत होत्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकल सेवेवर परत एकदा बंधन घालू शकतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments