आपलं शहर

Sachin Vaze : स्फोटकांप्रकरणी सचिन वाझेंची कबुली? NIA च्या वकिलांची जुबानी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबई येथील निवासस्थानी 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या प्रकरणाचा तपास एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र आता त्याच प्रकरणात सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.

शनिवारी तब्बल 13 तास वाझेंची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीनंतर वाझेंना NIA कडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.

सचिन वाझे या प्रकरणात अडकण्याचे कारण म्हणजे, अंबानींच्या घरासमोर जी गाडी सापडली होती त्याचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा संशयास्पद मृत्यू. हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर काही गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांचा खून सचिन वाझेंनी केल्याचा संशय आपल्याला असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते. सचिन वाझे मनसुख यांना अटक होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याची माहितीही हिरेन यांच्या पत्नीने दिली होती.

स्फोटकांप्रकरणी वाझेंची कबुली?
मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी स्फोटकांना भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती, त्यामध्ये आपणदेखील सामिल होतो अशी कबुली सचिन वाझेंनी दिली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments