आपलं शहर

Mumbai: शरद पवारांना हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान मोदींचा फोन

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्तशायच्या त्रासामुळे रूग्णालयात भरती करण्यात आलं होत.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांची विचारपूस करण्यात येत आहे.अनेकांनी ट्विटर वरुण शरद पवारांना त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.यात भाजपाच्या नेत्यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांची फोन करून विचारपूस केली असल्याचं समोर येतंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपली विचारपूस केली असल्याची माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विट मधून सांगितली आहे

शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील भेटीनंतर महराष्ट्रातील राजकारण नवे वेगळे वळण घेणार का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शरद पवार आपल्या ट्विटर हॅण्डल वरुण प्रकृतीची विचारपूस करणाऱ्यांचे आभार मानत आहे

मात्र अमित शाह यांच्या भेटीबद्दल त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेल नाही.देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आहेत.

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments