आपलं शहर

जेव्हा मी त्या मुलांना वडा पाव देतो, तेव्हा मला खूप समाधान मिळते, 5 रुपयांत वडापाव विकणारे मुंबईचे सतीश गुप्ता

Mumbai: सतीश गुप्ता मुंबईच्या सायन मध्ये वडापावचा स्टॉल लावतात.त्यांच्या स्टॉलची खास बात ही आहे की सतीश गुप्ता त्यांच्या कामात तोट – नफा बगत नाहीत. त्यांचं लक्ष गरीब मुलांची भूक मिटवण इतकच आहे ज्यांच्याकडे एक वेळेचे खाईचे पैसे नसतात.सतीश यांच्या स्टॉलवर जो कोणी मुलगा शाळेच्या गणवेशात येतो त्याला 5 रुपयाला वडापाव मिळतो.

सतीश स्वतः खूप हलाखीच्या परिस्थितीतून येतात.त्यांच्या जवळ काही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी छोटे – मोठे काम करायला सुरुवात केली. सतीश म्हणाले की, “मी कार साफ केली, केटरिंग लाइनमध्ये काम केले, तिथे मी कपडे धुतले, पुरी बनवल्या, सर्व काही केले. मला तिथून राहिलेले जेवण प्लास्टिकच्या पिशवीत मिळायचे जे मी माझ्या मुलांना खाण्यासाठी देत होतो. आयुष्य असेच गेले.”

“मी कधीही अन्न चोरी केली नाही. मला भूक माहित आहे, म्हणून आज मी वडापाव मुलांना फक्त 5 रुपयात विकतो. मला माहित नाही की कोणाकडे पैसे आहेत किंवा कोणाकडे नाही. मुंबईत मुले वाढवण्यासाठी लोक खूप संघर्ष करतात. जसे आम्ही केले. जेव्हा मी त्या मुलांना वडा पाव देतो, तेव्हा मला खूप समाधान मिळते.”सतीश म्हणाले.

सतीश यांच्या मुलाला आर्थिक परस्थिती नीट नसल्यामुळे शाळा सोडावी लागली पण त्याने त्याच्या आई वडिलांची साथ दिली. माझ्या मोठ्या मुलाने माझ्यासाठी जी कुरबानी दिली आहे ती मी कधीच नाही विसरणार.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments