आपलं शहर

मुंबईतील या कथाकाराच्या गोष्टी होत आहेत देशभर व्हायरल; कोण आहे हा कथाकार ?

वाचक मित्रांनो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबईतील एका कथाकाराच्या गोष्टी सांगतानाचे काही विडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. हा कथाकार कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा आहे. (Mumbai’s Storyteller Shantilal gulechha)

प्रेरणादायी गोष्टी सांगून फेमस होणाऱ्या या कथाकारचं नाव शांतीलाल गुलेच्छा आहे. शांतीलाल हे मुंबईत राहतात. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. शांतीलाल यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसली तरीही त्यांच्या गोष्टी सांगण्याच्या अंदाजावरून ते एक सःहृदय व्यक्ती असल्याचे जाणवते.

शांतीलाल गुलेच्छा यांना फिरण्याची आणि वेग वेगळे ज्ञान समापदं करून इतरांमध्ये ते ज्ञान वाटण्याची आवड आहे.
शांतीलाल यांचा गोष्ट सांगण्याचा अंदाज काही वेगळा आहे ज्यामुळे त्यांच्या व्हिडिओज ना फार चांगला प्रतिसाद मिळतो.

शांतीलाल यांच्या प्रत्येक विडिओ मध्ये ते लोकांच्या घोळक्यात केंद्रस्थानी बसलेले दिसतात, आणि यानंतर कोणत्याही एका जीवनाची मूल्य शिकवणाऱ्या विषयावर ते गोष्ट सांगायला सुरवात करतात. गोष्ट सांगायला सुरवात केल्यापासून गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोष्टीचा शेवट काय असेल याचा अंदाज बंधन तस कठीण आणि म्हणूनच श्रोते गोष्टींमध्ये गुंगून जातात. शांतीलाल यांच्या सर्व गोष्टी प्रेरणादायी आणि काही ना काही शिकवणाऱ्या असतात.

शांतीलाल यांचा पैसे स्वर्गात कसे घेऊन जायचे या गोष्टीचा विडिओ तुफान व्हायरल झाला त्यानंतर शांतीलाल यांनी अनेक यूट्यूब चॅनेल्ससाठी आपल्या खास शैलीतील विडिओ बनवले. हे सर्वच विडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. शांतीलाल यांचा असाच एक मैत्रीवर भाष्य करणारा विडिओ ज्यात जीवनामध्ये चांगले मित्र असणं किती गरजेचं आहे हे सांगण्यात आले आहे. #जिंदगी जीनी है तो अच्छे दोस्त रखना जरूरी है असा संदेश देणारा हा विडिओ खास तुमच्यासाठी

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments