कारण

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ठाण्यात 16 ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट जाहीर करून lockdown

Thane: ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90% असले तरी कोरोना patients मध्ये घट होताना दिसत नाहिये. ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून येथे तब्बल 16 ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले आहेत.या 16 ठिकाणी 31मार्च पर्यंत lockdown जाहिर करण्यात आलेला आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर या भागात तर, परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर हा भाग कोरोना हॉटस्पॉट आहे. परिमंडळ 3 मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले या भागाचा समावेश आहे.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी हा परिसरसुद्धा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता ठाण्यातील बाकीच्या परिसरातील व्यवहार राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार चालतील.

जर संसर्ग खूप वाढला तर भविष्यात कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवणं कठीण होईल. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 62,830 इतकी आहे आणि 60,578 रुग्ण बरे झालेले आहेत.सध्या 1,911 जणांवर उपचार चालू झाले आहेत.त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी हा lockdown जाहिर केला आहे.अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments