कारण

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं, काँग्रेस नेत्याची मागणी

मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झालेय. देशातील तब्बल 10 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं वृत्त काँग्रेसनेत्याने दिल्याने खळबळ माजली आहे.

देशात कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहे, त्यातच मुंबईतदेखील रुग्णांचे अनेक उच्चांक समोर येत आहेत. राज्यात रविवारी एकाच दिवशी तब्बल 40 हजार कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आल्याने आरोग्य विभागात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. (Narendra Modi, Uddhav Thackeray should come together again, Congress leader demands)

मुंबईसह राज्यातील कोरोनाचं संकट कमी करायचं असेल, तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एकत्र यावं लागेल, अशी मागणी चक्क काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress leader Milind Deora) यांनी केली आहे.

देशाच्या एकूण रुग्ण संख्येपेक्षा एकट्या मुंबई 10 टक्के रुग्ण आहे, तर देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात (GDP) मुंबईचा वाटा 6 टक्के आहे, त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुंबई महानगगरपालिकेने एकत्र येऊन कोरोना संपण्यावर काम केलं पाहिजे, असे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतल्या रुग्णांवर नियंत्रण आणायचं असेल, तर त्यासाठी एकच उपाय करावा लागेल, तो म्हणजे कोरोणाच्या चाचण्या वाढवाव्या लागतील, सोबतच लसीकरणाची मोहीम अजून जोरकसपणे सुरु केल्यास मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्यास मदत होईल, असं मतही मिलिंद देवरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे.

sharad pawar health news supriya sule stetus 1
Narendra Modi, Uddhav Thackeray should come together again

लॉकडाऊन पुन्हा…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पुन्हा लॉकडाऊनबद्दल माहिती दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी अशीच वाढत असेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत रविवारी, 28 मार्चरोजी 6 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एकादिवसात 40 हजार 414 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्यविभाताग चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments