फेमस

TV विश्वावर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट, या प्रमुख अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसके प्यार में’ मधील प्रमखु भूमिकेत दिसणारा नील भट याला कोरोनाची लागण झाली आहे. नील सध्या होम क्वारंटाईन असून अराम करत आहे. नील मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असल्यामुळे आता मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. (Neil Bhatt tested positive for Covid 19 )

मालिकेचे निर्माते राजेश राम सिंग आणि प्रदीप कुमार यांनी गुरुवारी नील भट ला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सगळीकडेच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांनी नील लवकर बरा होण्याची प्रार्थना करत नील वर प्रेमाचा वर्षाव केला.

‘गुम है किसके प्यार में’ या मालिकेचं चित्रीकरण सध्या मुंबईत होत आहे. रेणुका शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील, आदिश वैद्य यांसारखे मराठीतील काही अभिनेते या मालिकेचा भाग आहेत. ही मालिका एका मराठी कुटुंबावर आधारित आहे.

नीलला कोरोनाची सौम्य लक्षण जाणवताच त्याने तातडीने आपली कोरोना चाचणी केली. नीलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच सेट वरील इतर लोकांचे विलगीकरण करून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याबद्दल मुंबई महापालिकेला कळविले असून नियमानुसार संपूर्ण सेटवर सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments