आपलं शहर

Nose only mask | फक्त नाकावर लावणाऱ्या मास्कची जगाला भूरळ, तुम्ही कधी वापरताय…

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मेक्सिकोमध्ये बनवला 'नोस ओन्ली मास्क'

कोरोनाला थांबवण्यासाठी जगभरामध्ये संशोधक अनेक संशोधन करत आहेत. संशोधकांनी दिवस-रात्र मेहनत करून कोरोनाची लस तयार केली आहे. परंतु तरी देखील कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. मास्कचा वापर आणि त्याचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही.

अनेक संशोधक अजूनही नवनवीन शोध लावत असताना मेक्सिकोमध्ये मास्कचा नवीन शोध लावला आहे. मेक्सिकोमध्ये फक्त नाकाला झाकणारे मास्क तयार करण्यात आला आहे. हा मास्क फक्त नाकाला झाकत असल्याने याला नोस ओन्ली mask (nose only mask) असं म्हटलं जातं.(Nose only mask)

या मास्कमुळे कोरोना विषाणूला थांबवण्यास मदत होते असं म्हंटलं जातय. या मस्कच नेमकं वैशिष्ट्य अस आहे की, या मास्कमुळे आपले तोंड उघडे राहते त्यामुळे आपल्याला जेवण करताना, पाणी पिताना कोणतीही अडचण येत नाही. वेळोवेळी मास्क काढण्याची गरज भासत नाही. या मास्कवर आपण नॉर्मल मास्क देखील वापरू शकतो. जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठांने दिलेल्या माहितीनुसार कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर नाकाला झाकण जास्त गरजेचे आहे.

फोटोत दाखवल्याप्रमाणे हा मास्क फक्त नाकावर लावला जातो. त्यामुळे ते एखाद्या जोकर सारखे वाटत आहे. परंतु हा मास्क नाकाला कव्हर करत असल्यामुळे त्याच्या परिणामकारकतेवर शंका उपस्थित केली जात आहे. कोरोनाचा विषाणू फक्त नाकावाटेच शरीरात जातो, असं नाही तर हा विषाणू तोंडाद्वारे देखील शरीरात जातो त्यामुळे हा मास्क कितपत परिणामकारक आहे यावर प्रश्‍नचिन्ह आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments