भुक्कड

पपईच्या बियांचे हे फायदे जाणून आश्चर्य वाटेल; जाणून घ्या, कशावर आहे रामबाण औषध!

आजारी व्यक्तीने पपई खाल्ल्यास त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. Papaya is an elixir for many ailments

पपई आपण बर्‍याचदा खातो. कारण पपई हे एक औषधी फळ आहे. पपई हे फळ तसं पहायला गरम असते, पण रसाळ असल्याने खायला मजा येते. आजारी व्यक्तीने पपई खाल्ल्यास त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Papaya is an elixir for many ailments)

आपण पपई तर मिटक्या मारत खातो आणि त्याच्या बिया फेकुन देतो परंतु याच बिया पपई पेक्षा जास्त औषधी असतील असे कोणी तुम्हाला सांगितले तर? हो! हे खर आहे की पपई पेक्षा जास्त औषधी तत्त्व पपईच्या बियांमध्ये असते. ( benefits of papaya seeds)

काय आहेत पपईच्या बियांचे फायदे :

  1. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, पपईच्या बियांमध्ये प्रोटियॉलिटिक एंजाइम चा समावेश असतो ज्यामुळे आतड्यांमध्ये असणारे बैक्टीरिया मारतात ज्यामुळे पोट आणि आतड्या साफ होऊन पचनक्रिया सुधारते.
  2. मासिक पाळी सुधारण्यासाठी पपईचे सेवन करण्यास सांगितले जाते. परंतु याच पपईच्या बियांमध्ये काही असे घटक आहेत ज्यांमुळे पीरियड्स मध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
  3. पपईच्या बियांमध्ये फाइबर चे प्रमाण अधिक असते. वजन कमी करण्यासाठी अन्नात फायबर चे सेवन करने गरजेचे असते, म्हणुन वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी पपईच्या बियांचे सेवन करावे.
  4. पपईच्या बियांचा फेस पॅक बनवून लावला तर त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.  तसेच चेहर्‍यावरची मुरुम सुधा कमी होतात. महत्त्वाच म्हणजे त्वचा आणखीन तरुण वाटू लागते.
  5. पपईच्या बिया जर वाटून डोक्यावर लावल्या तर कोंडा निघून जाईल सोबतच रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल ज्यामुळे केसांची योग्य वाढ होण्यास मदत होईल. (One would be surprised to know these benefits of papaya seeds; Find out what’s on the panacea!)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments