खूप काही

बापरे बाप ! 5 डझन हापूस आंब्यांच्या पेटीला तब्बल लाखाचा भाव, तुम्हालाही येईल चक्कर….

उन्हाळा सुरू झाला की सर्वात आधी नजरे समोर येतो तो म्हणजे फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. उन्हाळा कितीही नकोसा वाटला तरीही आंबे खाण्यासाठी या उन्हाळ्याचीचं  वाट पाहावी लागते. मार्च एप्रिल महिन्यला सुरवात होताच बाजारपेठेत आंबे विक्रीसाठी येण्यास सुरुवात होते. गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेक लोकांना आंब्यांची मनोसक्त मज्जा अनुभवायला मिळाली परंतु यंदा ही मज्जा अनुभवयाला खवय्ये पूर्ण तयारीत आहेत आणि त्यांच्या याच उत्साहाला विक्रेत्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. कारण यंदा एक नवीन उपक्रम आंबे विक्रेत्यांसाठी राबवण्यात येत आहे. (online platform provide a great market rate to mango sellers )

कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. यंदा याच कोकणातील हापूस आंब्याला आंतराष्ट्रीय दर्जा आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्म द्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. 

कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीत मरीयेट येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यात राजापूर मधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन आंब्याच्या पेटली 1 लोक 8 हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. 

शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून  त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या मँगोटेक प्लटफॉर्म ची निर्मिती करण्यात आली. मायको ब्रॅण्डची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अँग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचर्सच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपायी अशी विक्रमी किंम देऊन घेतली. 

हापूस आंब्यांच्या पेटला  एवढी मोठी किंमत गेल्या शतकात मिळाली नव्हती जी आता मँगोटेक प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या या उपक्रमाला असाच भरगोस प्रतिसाद मिळत राहो. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments