खूप काही

ओरियोची पार्लेविरोधात याचिका दाखल, थेट डिझाईन कॉपी केल्याचा आरोप….

खाद्यविश्वातील एक मोठं नाव म्हणजे पार्ले. अनेक चॉकलेट्स, बिस्किट्स,आणि इतर खाद्यपदार्थांसाठी पार्ले ओळखले जाते. हाइडे अँड सिक हे तर पार्लेच लोकप्रिय बिस्कीट परंतु आता पार्लेवरच हाइडे होण्याची वेळ आली आहे. कारण ओरियो या बिस्कीट कंपनीने पार्ले विरोधात डिझाईन कॉपी केल्या विरोधात दिल्ली उच्च कोर्टात याचिका दाखल केली आहे. (Oreo files complaint against Parle.)

दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे सांगितले आहे. अमेरिकेतील मोंडलीज इंटरनॅशनलच्या इंटरकॉंटिनेंटल ग्रेट ब्रँड्स ने र्टेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित याचिका दाखल केली आहे.
नऊ फेब्रुवारी रोजी याच याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळेस उच्च न्यायालयाने ओरियो कंपनीच्या वकिलांनी या प्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी ही मागणी फेटाळली.

मोंडलीजने भारतात 10 वर्षांपूर्वी ओरियो बिस्कीट लाँच केलं होत. ओरियो ने आत्तापर्यंत आपल्या ब्रँडचे अनेक वेगवेवेगळ्या प्रकारच्या फ्लॅवोईर्सचे बिस्कीट लाँच केले आहेत. यामध्ये चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला, ऑरेंज, स्ट्रॉबेरी यांचा समावेश आहे. परंतु आता पार्लेने सुद्धा ओरियो सारखेच प्रॉडक्ट बाजारात आणले आहे ज्याचे नाव फॅबियो आहे जे फक्त नावानेच नाही तर दिसायला सुद्धा ओरियो सारखेच आहे. एक सारखे पणामुळे विक्री आणि ग्राहक वर्गावर याचा परिणाम होईल यामुळेच ओरियो ने ही याचिका दाखल केली आहे.

कोरोनाच्या काळात बिस्किटांचा मोठा खप झाल्याचं पाहायला मिळतय. त्यामध्ये पार्ले जी सोबत ओरियो चा ही खप वाढला लॉक डाउन दरम्यान पार्लेजीची विक्री फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments