कारण

खास ‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंनीही घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट…

गेले काही दिवस अनेक मुद्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. मध्यंतरी झालेले धनंजय मुंडेंचे प्रकरण असो किंवा संजय राठोड यांचे प्रकरण असो. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणांवरून विरोधीपक्ष भाजपने टीकास्त्र सोडले आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

पंकजा मुंडे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीमध्ये जळगाव येथील आशदीप महिला शासकीय वसतिगृहात घडलेल्या घटनेबद्दल चर्चा झाली. सरकारमध्ये असणारे लोकं जर चांगले वागत नसतील तर नागरिकांना तरी कशी शिस्त लावणार आहात. सत्तास्थानी असलेल्या लोकांचे वागणे बघून अधिकारी देखील तसेच वागतील, असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच, या भेटीमध्ये बीड जिल्हा बँकेच्या मुद्यावर देखील चर्चा झाली आहे. बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आमचे सर्वांचे फॉर्म अपात्र ठरवले गेले. हा आमच्यावरती अन्याय आहे. कोणतेही कारण नसताना आमचे फॉर्म अपात्र ठरवण्यात आले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments