फेमस

‘हे अमानुष, लज्जास्पद आणि हृदयद्रावक आहे’ या घटने बद्दल परिणितीने व्यक्त केले आपले मत

Zomato फूड डिलेवरी प्रकरणाला आता देशभरातून प्रतिक्रिया मिलत आहे . सोशल मीडिया साइट्स, इंन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर वर अनेक लोक या प्रकरणा बद्दल आपापल्या प्रतिक्रिया नोंदवून निषेध करत आहेत. (Pareeniti chopra is upset with the zomato food delivery incident)

या घटनेत zomato वर फूड डिलीवर करणाऱ्या इसमाने आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्या महिलेला केला पण हा आरोप खोटा असून त्या महिलेने आधी आपल्याला मारल्याची आणि स्व बचाव करताना त्या महिलेला लागल्याचा दावा फूड डिलीवर करणाऱ्या इसमाने केला आहे.  या प्रकरणी zomato तपासणी करत असून कोणाची बाजू खरी याचा शोध घेण्यात येत आहे.

महिलेच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर असंतोषाची लाट उसळली अनेक फेमिनिस्ट ग्रुप पुढे आले आणि या गोष्टीचा निषेध केला, परंतु कालांतराने घटनेची दुसरी बाजू समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या फूड डिलीवर करणाऱ्या इसमाची बाजू लक्षात घेऊन नक्की खर काय हे जाणून घेण्याची मागणी सर्व स्तरावरुन केली जाऊ लागली.
याच संदर्भात अभिनेत्री परिणिति चोप्रा हिने ट्वीटर वर आपले मत व्यक्त केले आहे. ज्यात परिणिति म्हणतेय, ‘झोमाटो इंडिया – कृपया सत्य शोधा आणि जाहीरपणे कळवा… जर तो माणून निर्दोष असेल (आणि मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील शिक्षा देण्यास आम्हाला मदत करा.. हे अमानुष, लज्जास्पद आणि हृदयद्रावक आहे.. मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो हे कृपया मला कळवा’

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments