खूप काही

Petrol and diesel update | पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

येत्या एक ते दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु दोन दिवसात हे दर कमी होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे सामान्य जनता चिंतेत होती. पेट्रोल डिझेलच्या दरात शेवटचा बदल 27 फेब्रुवारीला झाला होता. हा दर सलग 25 दिवस स्थिर होता. मुंबईत पेट्रोलचा दर 97.57 रुपये प्रति लिटर वरून 97.40 रुपये झाला आहे. पुण्यात एक लिटर पेट्रोलचा दर 97 रुपये, दिल्लीमध्ये 91 रुपये, पटनामध्ये 93 रुपये, इंदोर मध्ये 99 रुपये झाला आहे. (Petrol and diesel Price)

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू होत असतात. Goods return या वेबसाईटने पेट्रोलचे दर जारी केले आहेत.

24 दिवसानंतर आज पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या तेलाची किंमत 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना देण्याबाबत सरकारी तेल कंपन्या विचार करत आहेत. गेले तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र येत्या एक ते दोन दिवसांत त्या कमी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments