खूप काही

पेट्रोल- डिझेल बरोबर LPG चे दरही आता कमी होणार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच वक्तव्य

पेट्रोल- डिझेल, एलपीजीच्या वाढत्या किंमतिंना कंटाळलेल्या सामान्य माणसासाठी दिलासादायक बातमी आहे.केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितल की पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसची किंमत मार्च-एप्रिलपर्यंत कमी होऊ शकते.

धर्मेंद्र प्रधान हे काही दिवसांपूर्वी बोलले होते की “तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोलियम प्रॉडक्ट्स महाग होत आहेत.आपल्या देशाच्या हितासाठी अधिक नफा मिळविण्यासाठी, कच्च्या तेलाचा पुरवठा करणारे देश किंमती वाढवत आहेत.” थंडीमुळेही इंधन दरात वाढ होते, आता थंडीचा ऋतु गेला तर इंधन दरही कमी होईल असही ते म्हणाले.

कोरोनामुळे खपत कमी झाल्यामुळे तेल उत्पादक देशात तेलाच उत्पादन घटल होत पण आता परिस्थिती पुन्हा सुरळीत होऊ लागली तरी उत्पादन कमीच आहे म्हणून किंमतींमध्ये वाढ झाली आहे. या सगळयामुळे एलपीजीचा वापर वाढला आणि उत्पादनाअभावी किंमती वाढल्या.

भारत सगळ्यात जास्त तेल विकत घेतो आणि रशिया, कुवैत, कतर अश्या अन्य देशांवर तेलाच उत्पादन वाढवण्यासाठी दबाव आणला आहे. जेव्हा तेलाचं उत्पादन वाढेल तेव्हा प्रति बॅरल कॉस्ट आणि रिटेल तेलाची किंमत पण कमी होईल.देशभरात सध्या तेलाचे भाव 16 टक्क्यांनी वाढले आहेत.

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments