फेमस

दिल्लीतील एम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली ‘ही’ लस; नर्स पी. निवेदा यांनी दिली लस

आज (1मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात कोरोनाची पहिली लस घेतली. देशभरात आज म्हणजेच मार्च महिन्याच्या सुरवातीला कोरोना लसीकरणा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात, 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेले 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक कोरोना लस घेऊ शकतात. (Prime Minister Narendra Modi Took Vaccine)

कोणत्याही सुरक्षेविना आज नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी भारत बायोटेकच्या Co-Vaxine चा पहिला डोस घेतला. पुदुचेरी येथील नर्स पी. निवेदा (Nurse P. Niveda) यांनी पंतप्रधान मोदींना कोव्हॅक्सिनचे लसीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली लस घेतल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की, लस बसवल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, “कोरोना विषाणूविरूद्ध जागतिक लढाई बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी ज्या वेगाने कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. मी लसी घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना लस घेण्याचे आवाहन करतो. एकत्र मिळून आपण भारताला कोरोना मुक्त करूया. ”

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments