आपलं शहर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शवविच्छेदनाबाबत खुलासा

मुंबई: बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय टिक- टॉक स्टार पूजा चव्हाण हिने 2 फेब्रुवारी पुण्यात हडपसर मध्ये इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे आणि रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत.

आता पूजा चव्हाण हिच्या बाबतीत एक नवी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. एका वृत्तवाहिनीनुसार पूजा चव्हाण हिच्या शवविच्छेदनाचा अहवल वानवडी पोलिसांच्या हाती आला आहे. प्राथमिक अहवालासारखच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं कळत आहे.पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे.

या सगळ्या प्रकरणावर पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतीही माहिती आम्ही देऊ शकणार नाही असा पोलिस अध्यक्षांनी सांगितल आहे.पूजा चव्हाण आत्महत्येशी जोडले गेलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments