फेमस

International Womens Day 2021: राष्ट्रपतींनी महिलांना दिल्या शुभेच्छा, महिलांच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याचे दिले आव्हान

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांनी ट्विटरवर ट्विट करत महिलांना शुभेच्छा दिल्या.रविवारी राष्ट्रपतींनी सगळ्या देशवासीयांना महिलांच्या सुरक्षा, शिक्षा आणि स्वावलंबनसाठी अथक प्रयत्न करण्यासाठी appeal केल.

“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व देशवासियांना माझे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या देशातील महिला बर्‍याच क्षेत्रातील कामगिरीचे नवे विक्रम रचत आहेत. आज आपण सर्वजण महिला आणि पुरुष यांच्यातील असमानता पूर्णपणे काढून टाकण्यासाठी एकत्रित संकल्प करू”. कोविंद म्हणाले की ” आपण महिलांसाठी, विषेहतः आपल्या लेकिंसाठी अधिक सक्रिय, सक्षम आणि सशक्त बनण्याचा मार्ग प्रशस्त करू”.

या आंतरराष्ट्रीय महिलादिनी हा संकल्प करूया की महिलांच्या प्रगतीमध्ये बाधा टाकणाऱ्या प्रत्येक परंपरा आणि नितीला बदलण्यासाठी त्यांचं समर्थन करू. महिलांना शुभेच्छा देत ते म्हणाले की ” महिला आपल्या कुटुंब, समाज आणि देशासाठी एक प्रेरणा आहे”.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments