खूप काही

गाईच्या वासरासोबत तो प्रसंग आणि अहिल्याबाई निघाल्या आपल्या मुलाचा जीव घ्यायला

मालोरावांच्या रथासमोर आल्याने वासराला गंभीर दुखापत झाली आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंनी मालोजीरावांचे हातपाय बांधून रस्त्यावर झोपवलं आणि त्यांच्या अंगावरून रथाचा वार करण्याचे आदेश दिले.

एकदा महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर यांचा मुलगा मालोजीरावांचा रथ मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून जात असताना त्यांच्या वाटेत एक नवजात वासरू आले. गाय वासरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला उभी होती. मालोरावांच्या रथासमोर आल्याने वासराला गंभीर दुखापत झाली आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. ( Punyshlok Ahilybai’s decision, which take justice on high level, ajustice which was fair for a mother, fair for everyone. )

मालोजीरावांचा रथ पुढे निघून गेल्यावर ती गाय वासराजवळ रस्त्यावर बसली. थोड्या वेळाने अहिल्याबाई तेथून जात असताना त्यांना गाय वासराजवळ बसलेली दिसली, तेव्हा वासरू अपघातात मरण पावले, हे त्यांना समजण्यास फारसा वेळ लागला नाही.

सर्व घडामोडी जाणून घेतल्यावर अहिल्याबाईंनी दरबारात मालोजींची पत्नी मेनबाई यांना विचारले, “जर एखाद्या मुलाला आपल्या आईसमोर मारले तर त्याला काय शिक्षा द्यावी?” मालोजींच्या पत्नीने उत्तर दिले.“त्याला मृत्युदंड द्यावा.”

अहिल्याबाईंनी मालोजीरावांचे हातपाय बांधून रस्त्यावर झोपवलं. आणि त्यांच्या अंगावरून रथाचा वार करण्याचे आदेश दिले. कोणताही सारथी हे काम करण्यास तयार नव्हता.

अहिल्याबाई न्यायप्रिय होत्या. असे म्हणतात की जेव्हा कोणताही सारथी पुढे आला नाही, तेव्हा त्या स्वत: या रथावर स्वार झाल्या. तेव्हा एक अनपेक्षित घटना घडली, अहिल्याबाई रथ घेऊन पुढे जात असतानाच तीच गाय रथासमोर उभी राहिली. तिला पुन्हा पुन्हा रस्त्याच्या कडेला काढण्यात आले, पण ती पुन्हा रथासमोर उभी राहिली.

हे पाहून मंत्री राणीला म्हणाले, “या दयाळू गायीलासुद्धा दुसर्‍या आईच्या मुलाच्या बाबतीत असे होऊ द्यायचे नाही.” ती आपणास मालोजीसाठी दया दाखवण्याची विनंती करीत असल्याचं मंत्र्यांनी संकेत ओळखले.

इंदूरमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली ती अजूनही आडा बाजार म्हणून ओळखली जाते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments