खूप काही

Quill – The padhai app | दहावी-बारावीचे शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध होणार

quill the padhai app द्वारे बारावी आणि दहावीचे नोट्स मोफत मिळणार आहेत. कूपन कोड ("MumbaiMayor") हा आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी आणि संपूर्ण नोट्स मिळण्यासाठी Quill the padhai app उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु ह्या अँपद्वारे नोट्स मिळवण्यासाठी कूपन कोड गरजेचे असते. हा कोड मिळवण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. हे अँप टारगेट या प्रकाशनाने विकसित केलेले असून सध्या या ॲपचे एक लाखाहून अधिक सबस्क्राईबर आहेत.

मुंबईच्या महापौर माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी आज महत्वाची घोषणा केली. ही घोषणा 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी होती. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कोड घोषित केला गेला. ज्या कोडच्या मदतीने विद्यार्थ्यांना quill the padhai app द्वारे बारावी आणि दहावीचे नोट्स मोफत मिळणार आहेत. कूपन कोड (“MumbaiMayor”) हा आहे.(quill the padhai app)

या अँपमध्ये बोर्डाच्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचे नोट्स देखील आहेत. या अँपमुळे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विनामूल्य मिळत असल्याने त्याचा अधिकाधिक फायदा मिळवणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments