आपलं शहर

रेल्वे तिकीट महागले; भाडेवाढीच्या शर्यतीत रेल्वेचाही सहभाग

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याविरोधात देशभरात अनेक निदर्शनेही केली जात आहेत. कालपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आलेली आहे. आता या भाडवाढीच्या शर्यतीत रेल्वेही सहभागी झाली आहे. रेल्वेकडून मुंबईतील प्रमुख स्थानकांवर रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात दररोज होणारी भाडेवाढ यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता त्यात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट वाढवून त्यात आणखी भर पडली आहे. याआधी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर होता अवघे 10 रूपये. मात्र प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 50 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, स्थानकांवर होणारी अनावश्यक गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने ही भाडेवाढ केली असल्याची माहिती आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, पनवेल, ठाणे, इत्यादी प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 24 फेब्रुवारी 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लागू असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments